
विकासका सोबत करण्यात येणाऱ्या करारनाम्याबाबत
दि.२०/०१/२०२६
प्रति,
मा. सदस्य (घरमालक)
ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित
भूखंड क्र. ५३, सेक्टर-१५, वाशी, नवी मुंबई
विषय: विकासका सोबत करण्यात येणाऱ्या करारनाम्याबाबत
दिनांक २१/१२/२०२५ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत विकासका सोबत करण्यात येणाऱ्या करारनाम्याचा मसुदा मागविण्यात येईल. त्यावर सर्व सभासद, कार्यकारी मंडळ सदस्य, यांच्या सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर अंतीम मसुदा तयार करण्यात येऊन तो अंतीम मंजूरी करीता विशेष सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येईल असा ठराव मंजुर केलेला आहे. आता विकासक मे. गामी ग्रुप यांनी करारनाम्याचा मसुदा दिलेला आहे. तो सोसायटीच्या ग्रुपवर सर्व सभासदांच्या माहिती करीता दिनांक ०७/०१/२०२६ रोजी टाकण्यात आलेला आहे. तसेच सोसायटीची वेबसाईड https://omkarchsvashi.in/blog/development-agreement/ वर उपलब्ध आहे.
या नोटीसीव्दारे आपणांस सूचित करण्यात येते की, करारनाम्यात काही सूचना, दुरुस्ती व हरकती असल्यास त्या लिखित स्वरुपात किंवा Gmail address omkarcoophousingsocietyvashi@gmail.com वर दिनांक ३१/०१/२०२६ पर्यंत देण्यात याव्यात. मुदतीनंतर आलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.