GM Report December 2025 Hero Image

सभेचा वृत्तांत, डिसेंबर - २०२५


दि.३०.१२.२०२५

ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितची ७९ए ची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २१/१२/२०२५ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता गुजरात भवन, पहिला मजला, सेक्टर-१५ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३ येथे आयोजित करण्यात येत असल्याबाबात जावक क्र. ओमकार /२०२५/विसस/८२, दिनांक ०५/१२/२०२५ अन्वये सभेची नोटीस सर्व सभासदाच्या घरी पाठविण्यात आली होती. तसेच सोसायटीच्या व्हाटस्अॅप ग्रुपवर व https://omkarchsvashi.in या सोसायटीच्या वेबसाईडवर टाकण्यात आली होती.

आज दिनांक २१/१२/२०२५ रोजी सभेची नोटीस दिल्यानुसार एकुण १२६ सभासद उपस्थित होते. तसेच मे. लिलाधर परब आर्किटेक व डिझायनर आणि सोसायटीचे कायदेविषयक सल्लागार अॅड. अनिल खोपडे उपस्थित होते. परंतु मा. शरद वाघमारे उपनिबंधक कार्यालय सिडको अधिकारी वर्ग ०१ हे ठिक ११:०० वाजता हजर झाल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली. सचिव श्री. संदेश रेणोसे व अध्यक्ष श्री. विश्वास मोरे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर्व सभासदांचे स्वागत करुन उपस्थितांचे आभार मानले.

विषय क्रमांक ०१:- विषय सूचि मधील विषय क्रमांक ०१ सभेच्या अध्यक्ष पदाची निवड करणे असा प्रस्ताव सचिव यांनी ठेवला.

श्री. वसंत जोशी यांनी अध्यक्ष पदासाठी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष श्री. विश्वास बा. मोरे यांचे नांव सूचविले. त्यास श्री. प्रताप भालेराव यांनी अनुमोदन दिले. श्री. विश्वास मोरे यांनी अध्यक्ष स्थान स्विकारल्याचे सभे समोर जाहिर केले. आजच्या विशेष सर्वसाधारण सभेस उपस्थित सर्व सभासदांचे अभिनंदन केले. तसेच लांबून आलेल्या सभासदांचे कौतूक करतो असे नमूद करुन आतापर्यंत केलेल्या पुनर्विकास कामाचा आढावा सभेस सांगितला.

ठराव एकमताने मंजूर.

सूचक - वसंत जोशी

अनुमोदक प्रताप भालेराव

विषय क्रमांक ०२ सोसायटीच्या प्रस्तावित पुनर्विकासाकरीता योग्य विकासकाची नियुक्ती करणे.

सदर विषयावर चर्चा करण्यापूर्वी श्री. शरद वाघमारे यांनी स्वतःची ओळख करुन दिली. त्यानंतर उपस्थित सभासदांची यादी तपासली त्यावेळेस १२६ सभासद उपस्थित असल्याचे निदर्शनास आणून दिले. सोसायटी तर्फे १७६ सभासदांची माहिती पुरविण्यात आली होती. त्यामध्ये ०८ सभासद दोन सदनिका धारक असून १४ सभासद मयत असल्याचे नमूद केले होते. ०८ १४ २२ सभासद वजा करुन १५४ सभासद संख्या पकडून त्यावर २/३ टक्के प्रमाणे १०३ सभासदांची कोरम करीता हजेरी आवश्यक आहे. तथापि प्रत्यक्षात १२६ सभासद हजर असल्याने श्री. वाघमारे यांनी कोरम पूर्ण झाल्याचे जाहीर केले व अध्यक्षांना ठराव मांडण्याची सूचना केली.

मा. अध्यक्ष श्री. विश्वास मोरे यांनी निविदा प्राप्त झालेल्या विकासकांची सभेस थोडक्यात माहिती दिली. त्यापैकी सर्व प्रकारच्या छाननी नंतर दिनांक २९/११/२०२५ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत दोन विकासकांनी (१) Oakwoods Corporation (platinum Group) व (२) Lal Gebi Infra Pvt Ltd (Gami Group) यांनी प्रेझटेंशन दाखविले, मा. अध्यक्ष यांनी सभासदांना विनंती केली की, आपण दोन्ही विकासकांनी दाखविलेले Presentation बघीतले आहे. दोघापैकी आपणांस ७९ए च्या प्रोसेसकरीता एकाची निवड करायची आहे. त्या करीता आपल्या पंसतीच्या विकासकांचे नांव संमतीपत्राच्या फॉर्ममध्ये भरुन देण्याचे आवाहन केले होते. त्यावर प्लॅटीनम ग्रुपला १२ सभासदांची पंसती मिळाली व गामी ग्रुपला ११२ सभासदांची पंसती मिळाल्याचे सभेस सांगितले त्यानुसार सभेने मागील सभेत ठराव पारीत केला आहे.

त्यानंतर श्री. वाघमारे यांनी श्री. मोरे यांना गामी ग्रुपच्या बाजूने ठराव मांडण्याची सुचना केली असता श्री. मोरे यांनी ज्या सभासदांना गामी ग्रुपला मतदान करायचे आहे. त्यांनी हात उंचावून मत प्रदर्शन करावे असा प्रस्ताव ठेवला असता सर्व उपस्थित सभासदांनी हात उंचावून मान्यता दिली. तथापि गामी ग्रुपच्या विरोधात मतदान करावयाचे असल्यास त्या सभासदांनी हात वर करावेत असे आव्हान केले असता एकाही सभासदाने हात उंचावला नाही.

श्री. वाघमारे यांनी मतदानाचा कौल पाहून Lal Gebi Infra Pvt. Ltd. (गामी ग्रुप) या विकासकाची सभेने एकमताने निवड केल्याचे जाहीर केले. त्यावेळेस उपस्थित सर्व सभासदांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले..

ठराव

ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित च्या सर्व सभासदांनी बहुमताने निर्णय घेतला की, M/s.Lal Gebi Infra Pvt. Ltd. (गामी ग्रुप) यांना ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित भुखंड क्र. ३, सेक्टर १५ वाशी, नवी मुंबई यांचा पुनर्विकास करण्यासाठी विकासक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

ठराव सर्वानुमते मंजूर

सुचक : श्री. सिध्दप्पा उमदीकर

अनुमोदक - श्री. मधुकर जाधव

विषय क्र. ३- निवड झालेल्या विकासकास सदस्यांची लेखी संमती प्राप्त करणे.

सभेत विकासकाची निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी लेखी सहमती फॉमवर स्वाक्षरी करुन नोटरी बुकमध्ये स्वाक्षरी करण्याचे अवाहन सचिव श्री. संदेश रेणोसे यांनी केली असता सर्व उपस्थित सभासदांनी लेखी सहमती फॉर्मवर सहया करुन नोटरी रजिस्ट्ररला सही केली.

ठराव सर्वानुमते मंजूर

सूचना संदेश रेणोसे

अनुमोदक - मनोज वोव्हाळ

विषय क्र. ४- विकासकांना नियुक्ती पत्र देणेबाबत अध्यक्ष व सचिव यांना अधिकार प्रदान करणे. (Letter of Indent)

मा. अध्यक्ष यांनी सभेसमोर सांगितले की, श्री. वाघमारे यांनी गामी ग्रुप विकासकांची एकमताने निवड केली असल्याचे जाहीर केले असून तसा ठराव संमत झाला आहे. त्यांनतर विकासकाला नियुक्ती केल्याचे पत्र द्यावे लागेल त्याकरीता अध्यक्ष व सचिव यांना सर्व आवश्यक त्या बांबीचा विचार / अभ्यास करुन नियुक्तीपत्र देण्याचा प्रस्ताव ठेवला त्यास सर्व सभासदांनी मान्यता दिली.

ठराव सर्वानुमते मंजूर

सूचक - कृष्णकुमार एरोंडकर

अनुमोदक - अशोक गुरव

विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर मा. अध्यक्ष यांनी सभेला संबोधित केले की यापुढील प्रक्रिया विकासका सोबतचा करारनामा (DA) करण्याचा विकासकाकडून ड्राफ्ट मागविण्यात येईल त्यावर सर्व सभासद कार्यकारी मंडळ सदस्य यांच्या सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर अंतीम मसुदा तयार करुन लवकरात लवकर करारनामा (DA) करुन घेऊ असे सभेस संबोधित केले. त्यावर श्री. ज्योतीराम जाधव यांनी सूचना केली की, विकासका सोबतचा करण्यात येणारा करारनामा मंजूर करण्याकरीता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे त्यास सभेने मंजुरी दिली.

ठराव सर्वानुमते मंजूर

सूचक - ज्योतिराम जाधव

अनुमोदक हेमंत पवार

श्री. वसंत जोशी यानी सभेस सांगितले की, कार्यकारी मंडळ सर्व सभासदांना घेऊन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. सर्व कामकाज पारदर्शकतेने चालू आहे. कार्यकारी मंडळने आतापर्यंत केलेल्या कामाचे मी कौतूक करतो. वरील प्रमाणे सभेचे कामकाज पार पडल्यानंतर मा. अध्यक्ष यांनी सभेला संबोधित केले की, आजच्या सभेला अपेक्षा पेक्षा सभासदांचा प्रतिसाद मिळाला तसेच उपस्थित सभासदांमध्ये काही सभासद गावावरुन लांबून आलेले आहेत. त्यामुळे सभेच्या उपस्थितीत वाढ झाली आहे.

सर्व सभासदांनी उत्तम सहकार्य केल्याने आजची सभा चांगल्या प्रकारे पार पडली आहे. याबाबत मी सर्वांचे आभार मानतो.

सभेचे कामकाज पूर्ण झाल्याने दुपारी १ वाजता सभा संपल्याचे मा. अध्यक्षांनी जाहिर केले.