पीएमसी निविदा मागविणेबाबत
प्रति,
मा. सदस्य (घरमालक)
ओमकार को. ऑप सह सो.
वाशी नवी मुंबई
दिनांक : १६/११/२०२४
विषय : विशेष सर्वसाधारण सभेत मंजूरी दिल्यानुसार पीएमसी निविदा मागविणेबाबत.
महोदय,
दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पीएमसीसाठी निविदा मागविण्याबाबत चर्चा होऊन मंजूरी दिली आहे. सदर मंजुरीनुसार रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी पीएमसी निविदा मागविण्यात येणार असून ज्याना निविदा भरावयाच्या आहेत त्याना सदर निविदा कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- निविदा शुल्क रू.५०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) डिमाड ड्राफ्ट / युपीएस स्कॅनर
- निविदा देण्याची तारीख २५.११.२०२४ दि. १०.१२.२०२४ वेळ सकाळी ११ ते १ व संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत (रविवार चालू राहिल)
- निविदा स्विकारण्याची तारीख दि. ११.१२.२०२४ दि.२०.१२.२०२४ वेळ सकाळी ११ ते १ व संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत (रविवार चालू राहिल)
- निविदा उघडण्याची तारीख दि. २२.१२.२०२४ दुपारी ४.३० वाजता.
- अनामत रक्कम रू.१,००,०००/- (एक लाख फक्त) ज्या निविदा काराची निविदा स्विकारण्यात येईल तो वगळता इतर निविदा काराची अनामत रक्कम परत करण्यात येईल.
- अनामत रक्कम डिमांड ड्राफ्टने स्विकारली जाईल. ड्राफ्ट ओमकार को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड या नावाने देण्यात यावा. तरी सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की वर नमूद केल्यानुसार ज्याना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठी (पीएमसी) स्वारस्य असेल त्यानी निविदा रक्कम भरून कार्यालयातून घेवुन जावी.
टिप : दि.२०.१२.२०२४ रोजी रात्री ८.०० वाजेपर्यंत निविदा स्विकारण्यात येतील. ८.०० वाजल्यानंतर आल्यास निविदा स्विकारण्यात येणार नाही.
धन्यवाद।
Download the PMC Tender Invitation Letter